Wednesday, January 14, 2009
ई सकाळ चं घोडं कुठं अडलं?
मटा (पत्र नव्हे चावट मित्र !)वाले तर जाम माजलेत. वाचक वर्ग जास्त आहे.जिच्या घरी ताक तिचे वरती नाक अशी जगाची रीत असल्याने आपण काय करु शकतो? किती वेळा सांगितले तरी आचकट विचकट बातम्या पहिल्या पानावर टाकतात. त्यांना वाटतं त्याचं सेक्स न्यूज सेगमेंट सगळ्या जगात हॉट आहे. हॅट तुमच्या. अर्ध्या अधिक बातम्या कुठल्यातरी अमेरिकन संशोधनाचा मराठी अनुवाद. आणि नेहमी पहिल्या तीन बातम्यां मध्ये टाकतात. वैताग येतो. मी काय ते पहायला मटावर येतो का?
चिकार टुकार साईट्स पडल्या आहेत त्यासाठी. एका जनार्दनी आणि सेक्स न्यूज अगदी एक मेकांना चिकटून- हे फक्त मटाच करु जाणे.
सामना सामाईकसंकेत(युनिकोड)कधी पासून वापरणार? अग्निजंबूकावर(फायरफॉक्स)वाचता येत नाही नी काही नाही. कंटाळा येतो मग.
तुम्हाला काय वाटतं आपल्या(?) वृत्तपत्रांबद्दल?
Thursday, January 1, 2009
आय किस अ गर्ल -केटी पेरी यांच्या गाण्याचे रसग्रहण
आपण त्यांची बाजू न समजुन घेता उगाचच त्यांना नावं ठेवत असतो! त्यांना समजुन घेण्याचा हा एक मिश्किल प्रयत्न !
गाणं आहे. Katy Perry यांचं. गाण्याचे बोल आहेत आय किस अ गर्ल.
पहिल्या प्रथम गाण्याची ओळख करुन घेण्यासाठी ते ऐकायचं असेल तर इथे ते पाहता येईल.
आमचा रसग्रहणाचा तद्दन प्रयत्न इथे ऐकता येईल.
प्रतिक्रिया जरुर कळवा.
आपला
रसग्राहक
सुसाट
(मी प्रथम व्हिडिओ बनवणार होतो पण जाम मेहनत लागत आहे असे दिसले. त्यामुळे तो बेत रद्द केला. मी श्रोत्या ऐवजी प्रेक्षक शब्द वापरला आहे. तेवढा चालवून घ्या ! धन्यवाद.)
Tuesday, September 9, 2008
महाराष्ट्राके लोग हमें माफ कर दें ।
महराष्ट्रात बाहेरुन कुणी येणं प्रथमच होत नाहीये. कित्येक वर्षापासून बाहेरचे लोक येत आहेत इथले म्हणून रहात आहेत. उदाहरणार्थ आपण मारवाडी समाजाचा विचार करु. मूळचे राजस्थानचे असलेले हे लोक महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पसरलेले आहेत. पण त्यांनी घरात मारवाडी ठेउन व्यवहारात मराठीचा वापर केला. मला त्या समाजा बद्दल त्यामुळे आदर आहे. ते असं म्हणाले नाहीत, "हम राजस्थान से है, हम मारवाडी में ही बात करेंगे". असो मुद्दा हा की ते मराठीला तेवढंच जवळचं मानतात आणि ते मराठीच होतात. माझे मारवाडी मित्र मराठी कविता करतात बोलताना मराठीत बोलतात. मराठी माध्यमाच्या शाळेत जातात. याचा अर्थ असा झाला का की मराठी लोकांनी त्यांची गळचेपी केली? अर्थातच नाही. याला गुण्या गोविंदाने रहाणं म्हणतात.
दुसरं उदाहरण घेऊया. ते म्हणजे मुस्लिम समाजाचं. मुस्लिम समाज जिथे राहिला तिथली भाषा त्याने आत्मसात केली. प्रामुख्याने महाराष्ट्रभर पसरलेल्या मुस्लिम समाजा बद्दल बोलतो आहे मी. त्यांची मराठी माझ्या इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्या मराठी मित्रांपेक्षा अगदी उत्तम दर्जाची आहे. बेळगावातले मुस्लिम सुद्धा मराठी बोलतात. देशविरोधी कारवाया करणारे मुसलमान नव्हे तर ज्यांना या देशावर प्रेम आहे त्यांच्या विषयी सांगतो आहे.
अवधूत गुप्ते हा मराठीच. त्याने मुंबई बाहेरुन मुंबईत आलेल्या व मुंबईला आपलं मानणा-या लोकांसाठी गाणं काढलं. यातून मराठी माणसाची मिळून मिसळून राहण्याची प्रवृत्ती दिसते. "जय जय महाराष्ट्र मेरा" म्हणणा-यांना आम्ही सख्खे भाउ मानु. आम्हाला अशा मिक्स्ड महाराष्ट्राबरोबर प्रॉब्लेम नाहिये. प्रॉब्लेम आहे तो इथे येऊन अरेरावी करणा-यांशी.
त्यांची वृत्ती बघा. इथे यायचं. आणि इथल्या गोष्टींना नावं ठेवायची. याला काही अर्थ नाही. पटत नसेल तर चालते व्हा. कोणी आमंत्रण पत्रिका घेउन गेले नव्हते जया किंवा इतर परप्रांतीयांकडे. की या बाबांनो तुमच्या शिवाय महाराष्ट्राचे कसे होईल म्हणून. अशांना "नाठाळाच्या माथी हाणावी काठी" हाच न्याय लागू पडतो.
मराठी माणूस अध्यात ना मध्यात रहायला पहातो. कित्येक लोकांना भूमिकाच घेता येत नाही. मराठींच्या बाजूने उभे राहणे म्हणजे काही राजला समर्थन देउन रस्त्या रस्त्याने भैय्यांना बडवत फिरणे नव्हे. तुम्हाला तुमचं म्हणणं खणखणीत पणे सांगता आलं पाहीजे. तर मराठी बांधवांने भुमीका घ्या कुठली तरी. आम्हाला त्याचे काय म्हणून लटकत राहु नका. तुमचे फुटीरतावादी महाराष्ट्राला न मानणारे परप्रांतीय मित्र असतील तर त्यांना जाब विचरता आला पाहिजे.
आता जयाकडे वळूया. जयाजी वगैरे म्हणायची आता गरज वाटत नाही. महराष्ट्राला मान न देणार्यांना आम्ही मान देत नसतो. पण अगदी बुढ्ढी गुड्डी पण म्हणावसं वाटत नाही. बच्चन कुटुंबा बद्दल मला व्यक्तिश: अस्था राहिलेली नाही. त्यांना एकच सांगणे आहे एवढा युपीचा पुळका असेल तर चालते व्हा ना. घर बंगले गाड्या सोडवते का तुम्हाला? नाही ना. मग आम्हाला इतक्या वर्षाची आमची भाषा कशी सोडवी वाटेल?
जयाला नसती बहादुरी नडली आहे. कारण नसताना महाराष्ट्राचा विषय काढून टोमणवायची गरज नाव्हती. होत असलेले मलमत्ता नुकसान पाहून आणि दिगदर्शकांकडुन दट्ट्या बसल्याने आता माफीचे फाल्तु नाटक कशाला? महाचालूपणा आहे यांचा. महाराष्ट्र आई सारखा आहे म्हणे यांना. राजने कडक भूमिका घेतली नसती तर बोलली असती का ती हे? आई सारखा आहे तर मग "हम महराष्ट्राके है" असं म्हणाली असती ती, पण "हम युपी के है" असं म्हणाली. खरंच जया मनातनं उतरली. मुंबईला महाराष्ट्रातून काढावे अशी राज्यसभेत याचिका करणारी जयाच होती हे माहीत असावे म्हणून जाता जाता सांगतो, असो.
अमिताभ बद्दल वाईट वाटते. असंगाशी संग केल्याने त्यांनाही त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. न जाणो ते काय विचार करतात. सध्याला तरी या प्रांतवादात त्यांना गोवावे वाटत नाही.
पण जयाला जर इथे रहायचं असेल, गमावलेलं स्थान आणि आदर परत मिळवायचा असेल तर आता अशी वेळ आलीये की तिला खरंच आणि मना पासून म्हणावं लागेल. महाराष्ट्राके लोग हमें माफ कर दें ।
Wednesday, August 27, 2008
अमेरिकेत जन्मलेली माजुरडी जनरेशन.
http://in.youtube.com/watch?v=fJ1VGif5guI
Monday, July 21, 2008
HIV +Ve मॅट्रिमॉनिअल साईट. स्प्रेड द वर्ड.
http://www.positivesaathi.com/default1
सहज कुठे तरी ही साईट सापडली. कन्सेप्टचं कौतुक करावसं वाटलं. अनिल कुमार वळिव या शासकीय सेवेत रुजु असलेल्या अधिका-याने ही साईट सुरु केली आहे.
आपण त्यातले नाही मग आपण कशाला पहा? असं तुम्हाला वाटेल, पण जरुर पहा. म्हणजे आपण एचआयव्हि बाधित नसल्याचं आपल्याला भाग्याचं वाटेल.
आणि कोणी तसे मार्ग अवलंबत असतील किंवा तसला विचार करत असतील, तर निदान ते तरी जागे होतील.
मी काही या विषयावरचा तज्ञ नाही किंवा कार्यकर्ता ही नाही पण साईट वरच्या लोकांचे प्रोफाईल्स पाहिले आणि थरकाप उडाला. जास्त प्रोफाइल्स नाहियेत अजून पण आहेत त्यातल्या एकेक दोन दोन ओळीच जाळ करुन जातात. मराठी लोकांचे प्रोफाईल्सही आहेत. मी पॉझिटिव्ह कसा झालो ते लोकांनी एकदोन ओळीत लिहिलं आहे. " मी एकुलता एक मुलगा आहे. सॉफ्टवेअर मध्ये काम करतो. घरी अजून माहित नाहीये." किंवा "मी बॅंकिंग मध्ये काम करते. मध्यम वर्गीय कुटुंबातली" बरेच स्टुडंट्स सुद्धा आहेत. अगदी बीई बीटेक वाले सुद्धा.
परवाच ब्लड ब्रदर्स हि शॉर्ट फिल्म पाहिली होती. त्याचा इम्पॅक्ट विरत नव्हता तोच फरहान अख्तरची पॉसिटिव्ह ही मूव्हि पाहिली. ब्लड ब्रदर्स खूप पटीने चांगली आहे. मीरा नायरची पण एक मूव्ही आहे मायग्रेशन नावाची. पण ती कुठे मिळाली नाही. असो.
ब्लॉग चा उद्देश एकच.मित्रहो. स्वत:ला जपा.
http://in.youtube.com/watch?v=_F4VaxNZp2Y
http://in.youtube.com/watch?v=7u5nV7nz9_w&feature=related