Monday, July 21, 2008

HIV +Ve मॅट्रिमॉनिअल साईट. स्प्रेड द वर्ड.

पॉसिटिव्ह लोकांसाठीची मॅट्रिमॉनिअल साईट.

http://www.positivesaathi.com/default1

सहज कुठे तरी ही साईट सापडली. कन्सेप्टचं कौतुक करावसं वाटलं. अनिल कुमार वळिव या शासकीय सेवेत रुजु असलेल्या अधिका-याने ही साईट सुरु केली आहे.
आपण त्यातले नाही मग आपण कशाला पहा? असं तुम्हाला वाटेल, पण जरुर पहा. म्हणजे आपण एचआयव्हि बाधित नसल्याचं आपल्याला भाग्याचं वाटेल.
आणि कोणी तसे मार्ग अवलंबत असतील किंवा तसला विचार करत असतील, तर निदान ते तरी जागे होतील.
मी काही या विषयावरचा तज्ञ नाही किंवा कार्यकर्ता ही नाही पण साईट वरच्या लोकांचे प्रोफाईल्स पाहिले आणि थरकाप उडाला. जास्त प्रोफाइल्स नाहियेत अजून पण आहेत त्यातल्या एकेक दोन दोन ओळीच जाळ करुन जातात. मराठी लोकांचे प्रोफाईल्सही आहेत. मी पॉझिटिव्ह कसा झालो ते लोकांनी एकदोन ओळीत लिहिलं आहे. " मी एकुलता एक मुलगा आहे. सॉफ्टवेअर मध्ये काम करतो. घरी अजून माहित नाहीये." किंवा "मी बॅंकिंग मध्ये काम करते. मध्यम वर्गीय कुटुंबातली" बरेच स्टुडंट्स सुद्धा आहेत. अगदी बीई बीटेक वाले सुद्धा.
परवाच ब्लड ब्रदर्स हि शॉर्ट फिल्म पाहिली होती. त्याचा इम्पॅक्ट विरत नव्हता तोच फरहान अख्तरची पॉसिटिव्ह ही मूव्हि पाहिली. ब्लड ब्रदर्स खूप पटीने चांगली आहे. मीरा नायरची पण एक मूव्ही आहे मायग्रेशन नावाची. पण ती कुठे मिळाली नाही. असो.

ब्लॉग चा उद्देश एकच.मित्रहो. स्वत:ला जपा.

http://in.youtube.com/watch?v=_F4VaxNZp2Y

http://in.youtube.com/watch?v=7u5nV7nz9_w&feature=related

2 comments:

Anil Valiv said...

Thanks a lot my dear friend for saying a few warm words about my site. I am Anil Valiv. The creator of the site positivesaathi.com. (I dont know how to type in Marathi/ Devanagari font here thats why using English). I have seen many of my friends suffering from this +ve status. I can imagine the pains of laks of my Indian brothers and sisters. Thought of providing a platform of match-making to them. It's the wish of almighty only. I am only the medium through which the god is serving the sufferers. If u know some +ve friends; please tell them to communicate with me. positivesaathi@yahoo.com.
God bless u.

सुसाट said...

धन्यवाद अनील. तुमच्या या कार्याला अनेक शुभेच्छा.HIV positive लोकांसाठी तुम्ही जे करत आहात ते खरंच वेगळं आणि गरजेचं आहे. कुठुन तुम्हाला याची प्रेरणा मिळाली?
माझ्या ओळखीत तरी कुणी नाही पण शक्य तेवढा प्रसार मी करेन.
तुम्हाला हा ब्लॉग कसा काय सापडला?