Wednesday, January 14, 2009

ई सकाळ चं घोडं कुठं अडलं?

दोन दिवस झाले ईसकाळ वाचता येत नाही. पेपर बंद पडला की काय? तसं इथल्या बातम्यावर आमचं फार प्रेम आहे असे नाही पण दोन चार टुकार दोन चार भिकार आणि ज्याने माझ्या आयुष्यात किंवा ज्ञानत काही फरक पडत नाय अशा बातम्या वाचल्या शिवाय दिवस जात नाही.अडली गाय खाते काय.अशी गत झाली आहे आपली.

मटा (पत्र नव्हे चावट मित्र !)वाले तर जाम माजलेत. वाचक वर्ग जास्त आहे.जिच्या घरी ताक तिचे वरती नाक अशी जगाची रीत असल्याने आपण काय करु शकतो? किती वेळा सांगितले तरी आचकट विचकट बातम्या पहिल्या पानावर टाकतात. त्यांना वाटतं त्याचं सेक्स न्यूज सेगमेंट सगळ्या जगात हॉट आहे. हॅट तुमच्या. अर्ध्या अधिक बातम्या कुठल्यातरी अमेरिकन संशोधनाचा मराठी अनुवाद. आणि नेहमी पहिल्या तीन बातम्यां मध्ये टाकतात. वैताग येतो. मी काय ते पहायला मटावर येतो का?
चिकार टुकार साईट्स पडल्या आहेत त्यासाठी. एका जनार्दनी आणि सेक्स न्यूज अगदी एक मेकांना चिकटून- हे फक्त मटाच करु जाणे.

सामना सामाईकसंकेत(युनिकोड)कधी पासून वापरणार? अग्निजंबूकावर(फायरफॉक्स)वाचता येत नाही नी काही नाही. कंटाळा येतो मग.

तुम्हाला काय वाटतं आपल्या(?) वृत्तपत्रांबद्दल?

Thursday, January 1, 2009

आय किस अ गर्ल -केटी पेरी यांच्या गाण्याचे रसग्रहण

प्रस्तुत ब्लॉग एका प्रसिद्ध अमेरिकन गाण्याचा सार समजुन घेण्यासाठी एका मराठी मनाने केलेला प्रामाणिक प्रयत्न तुमच्या पर्यंत पोचवण्यासाठी प्रसिद्धिस घातला आहे.
आपण त्यांची बाजू न समजुन घेता उगाचच त्यांना नावं ठेवत असतो! त्यांना समजुन घेण्याचा हा एक मिश्किल प्रयत्न !
गाणं आहे. Katy Perry यांचं. गाण्याचे बोल आहेत आय किस अ गर्ल.


पहिल्या प्रथम गाण्याची ओळख करुन घेण्यासाठी ते ऐकायचं असेल तर इथे ते पाहता येईल.


आमचा रसग्रहणाचा तद्दन प्रयत्न इथे ऐकता येईल.

प्रतिक्रिया जरुर कळवा.

आपला
रसग्राहक
सुसाट

(मी प्रथम व्हिडिओ बनवणार होतो पण जाम मेहनत लागत आहे असे दिसले. त्यामुळे तो बेत रद्द केला. मी श्रोत्या ऐवजी प्रेक्षक शब्द वापरला आहे. तेवढा चालवून घ्या ! धन्यवाद.)