Tuesday, September 9, 2008

महाराष्ट्राके लोग हमें माफ कर दें ।

महराष्ट्रात बाहेरुन कुणी येणं प्रथमच होत नाहीये. कित्येक वर्षापासून बाहेरचे लोक येत आहेत इथले म्हणून रहात आहेत. उदाहरणार्थ आपण मारवाडी समाजाचा विचार करु. मूळचे राजस्थानचे असलेले हे लोक महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पसरलेले आहेत. पण त्यांनी घरात मारवाडी ठेउन व्यवहारात मराठीचा वापर केला. मला त्या समाजा बद्दल त्यामुळे आदर आहे. ते असं म्हणाले नाहीत, "हम राजस्थान से है, हम मारवाडी में ही बात करेंगे". असो मुद्दा हा की ते मराठीला तेवढंच जवळचं मानतात आणि ते मराठीच होतात. माझे मारवाडी मित्र मराठी कविता करतात बोलताना मराठीत बोलतात. मराठी माध्यमाच्या शाळेत जातात. याचा अर्थ असा झाला का की मराठी लोकांनी त्यांची गळचेपी केली? अर्थातच नाही. याला गुण्या गोविंदाने रहाणं म्हणतात.

दुसरं उदाहरण घेऊया. ते म्हणजे मुस्लिम समाजाचं. मुस्लिम समाज जिथे राहिला तिथली भाषा त्याने आत्मसात केली. प्रामुख्याने महाराष्ट्रभर पसरलेल्या मुस्लिम समाजा बद्दल बोलतो आहे मी. त्यांची मराठी माझ्या इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्या मराठी मित्रांपेक्षा अगदी उत्तम दर्जाची आहे. बेळगावातले मुस्लिम सुद्धा मराठी बोलतात. देशविरोधी कारवाया करणारे मुसलमान नव्हे तर ज्यांना या देशावर प्रेम आहे त्यांच्या विषयी सांगतो आहे.

अवधूत गुप्ते हा मराठीच. त्याने मुंबई बाहेरुन मुंबईत आलेल्या व मुंबईला आपलं मानणा-या लोकांसाठी गाणं काढलं. यातून मराठी माणसाची मिळून मिसळून राहण्याची प्रवृत्ती दिसते. "जय जय महाराष्ट्र मेरा" म्हणणा-यांना आम्ही सख्खे भाउ मानु. आम्हाला अशा मिक्स्ड महाराष्ट्राबरोबर प्रॉब्लेम नाहिये. प्रॉब्लेम आहे तो इथे येऊन अरेरावी करणा-यांशी.

त्यांची वृत्ती बघा. इथे यायचं. आणि इथल्या गोष्टींना नावं ठेवायची. याला काही अर्थ नाही. पटत नसेल तर चालते व्हा. कोणी आमंत्रण पत्रिका घेउन गेले नव्हते जया किंवा इतर परप्रांतीयांकडे. की या बाबांनो तुमच्या शिवाय महाराष्ट्राचे कसे होईल म्हणून. अशांना "नाठाळाच्या माथी हाणावी काठी" हाच न्याय लागू पडतो.

मराठी माणूस अध्यात ना मध्यात रहायला पहातो. कित्येक लोकांना भूमिकाच घेता येत नाही. मराठींच्या बाजूने उभे राहणे म्हणजे काही राजला समर्थन देउन रस्त्या रस्त्याने भैय्यांना बडवत फिरणे नव्हे. तुम्हाला तुमचं म्हणणं खणखणीत पणे सांगता आलं पाहीजे. तर मराठी बांधवांने भुमीका घ्या कुठली तरी. आम्हाला त्याचे काय म्हणून लटकत राहु नका. तुमचे फुटीरतावादी महाराष्ट्राला न मानणारे परप्रांतीय मित्र असतील तर त्यांना जाब विचरता आला पाहिजे.

आता जयाकडे वळूया. जयाजी वगैरे म्हणायची आता गरज वाटत नाही. महराष्ट्राला मान न देणार्यांना आम्ही मान देत नसतो. पण अगदी बुढ्ढी गुड्डी पण म्हणावसं वाटत नाही. बच्चन कुटुंबा बद्दल मला व्यक्तिश: अस्था राहिलेली नाही. त्यांना एकच सांगणे आहे एवढा युपीचा पुळका असेल तर चालते व्हा ना. घर बंगले गाड्या सोडवते का तुम्हाला? नाही ना. मग आम्हाला इतक्या वर्षाची आमची भाषा कशी सोडवी वाटेल?

जयाला नसती बहादुरी नडली आहे. कारण नसताना महाराष्ट्राचा विषय काढून टोमणवायची गरज नाव्हती. होत असलेले मलमत्ता नुकसान पाहून आणि दिगदर्शकांकडुन दट्ट्या बसल्याने आता माफीचे फाल्तु नाटक कशाला? महाचालूपणा आहे यांचा. महाराष्ट्र आई सारखा आहे म्हणे यांना. राजने कडक भूमिका घेतली नसती तर बोलली असती का ती हे? आई सारखा आहे तर मग "हम महराष्ट्राके है" असं म्हणाली असती ती, पण "हम युपी के है" असं म्हणाली. खरंच जया मनातनं उतरली. मुंबईला महाराष्ट्रातून काढावे अशी राज्यसभेत याचिका करणारी जयाच होती हे माहीत असावे म्हणून जाता जाता सांगतो, असो.

अमिताभ बद्दल वाईट वाटते. असंगाशी संग केल्याने त्यांनाही त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. न जाणो ते काय विचार करतात. सध्याला तरी या प्रांतवादात त्यांना गोवावे वाटत नाही.

पण जयाला जर इथे रहायचं असेल, गमावलेलं स्थान आणि आदर परत मिळवायचा असेल तर आता अशी वेळ आलीये की तिला खरंच आणि मना पासून म्हणावं लागेल. महाराष्ट्राके लोग हमें माफ कर दें ।

No comments: