Wednesday, January 14, 2009

ई सकाळ चं घोडं कुठं अडलं?

दोन दिवस झाले ईसकाळ वाचता येत नाही. पेपर बंद पडला की काय? तसं इथल्या बातम्यावर आमचं फार प्रेम आहे असे नाही पण दोन चार टुकार दोन चार भिकार आणि ज्याने माझ्या आयुष्यात किंवा ज्ञानत काही फरक पडत नाय अशा बातम्या वाचल्या शिवाय दिवस जात नाही.अडली गाय खाते काय.अशी गत झाली आहे आपली.

मटा (पत्र नव्हे चावट मित्र !)वाले तर जाम माजलेत. वाचक वर्ग जास्त आहे.जिच्या घरी ताक तिचे वरती नाक अशी जगाची रीत असल्याने आपण काय करु शकतो? किती वेळा सांगितले तरी आचकट विचकट बातम्या पहिल्या पानावर टाकतात. त्यांना वाटतं त्याचं सेक्स न्यूज सेगमेंट सगळ्या जगात हॉट आहे. हॅट तुमच्या. अर्ध्या अधिक बातम्या कुठल्यातरी अमेरिकन संशोधनाचा मराठी अनुवाद. आणि नेहमी पहिल्या तीन बातम्यां मध्ये टाकतात. वैताग येतो. मी काय ते पहायला मटावर येतो का?
चिकार टुकार साईट्स पडल्या आहेत त्यासाठी. एका जनार्दनी आणि सेक्स न्यूज अगदी एक मेकांना चिकटून- हे फक्त मटाच करु जाणे.

सामना सामाईकसंकेत(युनिकोड)कधी पासून वापरणार? अग्निजंबूकावर(फायरफॉक्स)वाचता येत नाही नी काही नाही. कंटाळा येतो मग.

तुम्हाला काय वाटतं आपल्या(?) वृत्तपत्रांबद्दल?

2 comments:

Yawning Dog said...

अग्निजंबूक mastach haan :)

Unknown said...

मुख्यमंत्र्यांनी अमिताभला टाळले!
27 Mar 2010, 1357 hrs IST

बाकी प्रश्ना नाहीत का महारास्त्रा ला
ही मटाची बातमी का नओटंकी गिरी.
अरे तुम्ही हजाम की पत्रिकार?
बंद करा हे धंदे
घ्या झोळ्या आणि बसा CST समोर